वणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बच्चु कडुच्या आंदोलनास समर्थन…

0
50

वणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बच्चु कडुच्या आंदोलनास समर्थन..
तालुका प्रतिनिधी
वणी – देशातील पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना अस्मानी संकट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात सर्वत्र कोसळले असुन
सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले आहे, आज सोयाबीन चे एकरी 2 ते 3 क्विंटल झाले तरी ते विकण्यासाठी बाजारपेठत नेले असता 1000 ते 1200 रूपये दराने विक्री होते आहे, कापूस हा आज पर्यंत घरात पडला नाही, थोडाफार निघाला आहे तर व्यापारी घेण्यास तयार नाहीत, अशा क्षणाला अस्मानी संकट थैमान घालत आहे, सरकार लाडक्या बहिनी व उद्योग पती करीता उदार होत असताना शेतकऱ्यांकरीता उदास दिसत आहे, सरसकट कर्ज माफीची घोषणा वाऱ्यावर विरून जाऊ नयेत म्हणून सर्व शेतकऱ्यांना घेऊन बच्चु कडु, वामणराव चटप, राजु शेट्टी, नितेश कऱ्हाडे मास्तर सह नागपूर आंदोलन सुरू करून खान मांडुन रस्तावर बसले आहेत, सर्वञ रेल्वे जाम करु अशी घोषणा बच्चुभाऊनी दिली असता देवेंद्र फडणवीस यांच्या छातीत धडकी भरली असून,पोलीसान करवी दडपशाही आंदोलनाची सुरुवात झाली आहे, न्यायालयाने आंदोलन मागे घ्यावे असा न्यायकारी फतवा काढला आहे, तरी या आंदोलनास समर्थन करीत असुन आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब वणीच्या मार्फत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले असून याप्रसंगी मधुकर लांडे, मनोज काळे, दिलीप परचाके, लक्षण देठे, गजानन राजुरकार, कुंदन टोंगे, पुंडलिक पिंपळशेंडे, संजयजी गोहोकार, किसना राजूरकार, सेनापती पावडे, संदिप ठावरी, विजय ठावरी, महेंद्र पाटील, जितु ठेंगणे, किशोर भाऊ थेरे, निखील नागोसे, ॳॅड तेलतुंबडे, ॳॅड मोहरमपुरी, गीत घोष साहेब, अमण शेख साहेब सह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते,