वणी पोलीसांची दंडुकशाही

0
389

■वणी पोलीसांची दंडुकशाही….
■मुलाला मारहाण केल्याची तक्रार दाखल…
वणी:वणी पोलीस स्टेशनच्या एका खाकी वर्दीवाल्याने कोणतीही शहनीशा न करत एका मुलांना बेदम मारहान केल्याची तक्रार वणी दि.१३।आँक्टोबर२०२५रोजी पो.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या कडे केली.सविस्तर असे की,साहिल नंदु जुमनाके वय२०वर्ष रा.वणी वाँटर सप्लाय जवळ हा शनिवारी.वरोरा येथे दुध आणण्याकरीता छोटा हत्ती या गाडीवर वाहक म्हणून गेला असता तो रात्री २वाजता वणी येथे परत आला तो गाडी उभी करुन दुचाकी वाहणाने आपल्या घरी जात असताना महाराष्ट्र बँक जवळ पो.काँ.वसीम पो.स्टे.वणी साहिलची विचारपूस केली साहिलने कुठन आलो याची माहिती दिली.साहिल हा घराकडे पुढे जात असताना वसीम यांनी त्यांचा पाठलाग करुन अकारण बेदम मारहाण केली.झालेला प्रकार हा साहिने आपल्या आई बरोबर कथन केला कारण नसताना आपल्या मुलाला नाहक मारल्याने पिडीताच्या आईने वणी पोलीस स्टेवर धाव घेऊन तक्रार दाखल करीत कार्यवाही ची मागणी केली आहे.