जिल्हा परिषद गणातील आरक्षण बदलासाठी तहसीलदारांना निवेदन सादर

0
299

जिल्हा परिषद गणातील आरक्षण बदलासाठी तहसीलदारांना निवेदन सादर

झरी-जामणी प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर २०२५

झरी-जामणी तहसील अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण “महिला” ऐवजी “सर्वसाधारण (स्त्री-पुरुष)” करण्याची मागणी करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन आज तहसीलदार व तहसील निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आले

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संबंधित गणाचे आरक्षण “सर्वसाधारण (महिला)” असे होते. यावेळी पुन्हा त्याच प्रकारचे आरक्षण ठेवणे रोटेशन तत्त्वाच्या विरोधात आणि अन्यायकारक ठरते.

निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रत्येक निवडणुकीनंतर आरक्षणात बदल होणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्वाची समान संधी मिळते. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद गणाचे आरक्षण “अनुसूचित जमाती (सर्वसाधारण स्त्री-पुरुष)” असे घोषित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सन २०१७ मधील आरक्षण तपशीलानुसार —

माथार्जुन–मार्की गण : सर्वसाधारण (महिला)

मुकुटबन–पाटण गण : सर्वसाधारण (महिला)

त्यामुळे यावेळी या दोन्ही गणांना “अनुसूचित जमाती (सर्वसाधारण स्त्री-पुरुष)” असा प्रवर्ग देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

तसेच, पाटण, मुकुटबन, माथार्जुन आणि मार्की (कोसारा) पंचायत समिती सर्कलचे २०१७ मधील आरक्षण तपशील सादर करून, समान संधी व न्याय्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी रोटेशननुसार बदल करण्याची अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन सादर करतांना बाबुलाल झिञु कनाके, रमेश दौलतराव आञाम, अरूण पैकूजी येडमे, योगेश कारू मडावी, माधव जलपत आञाम , विनोद हरिदास पिंपळकर, आणि नानूभाऊ उद्धवराव कोडापे उपस्थित होते.