वणीत शेतकरी संघटनेचा महाएल्गार मेळावा गाजला

0
73

वणीत शेतकरी संघटनेचा महाएल्गार मेळावा गाजला

बच्चु कडुंचा हल्लाबोल
३० जुन कर्जमाफी नाही तर, १ जुलैला राज्यात एकही रेल्वे चालू देणार नाही….

तालुका प्रतिनिधी ▪️

वणी : दि ४ जानेवारी रोजी वणी शहरातील शासकीय मैदानावर दु ३ वाजता आयोजित भव्य शेतकरी महाएल्गार मेळाव्याला शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण भागातील जनतेचा उत्सुकत प्रतीसाद लाभला. या मेळाव्यात माजी मंत्री मा श्री बच्चु कडु, जेष्ठ शेतकरी नेते ॲड वामणराव चटप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

बच्चु कडु यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. ” शेतकरी तयार असेल तर जीव गेला तरी चालेल……. शेतकरी सगळ्यांचे बाप आहे. हे लक्षात ठेवा अशा आक्रमक शब्दात त्यांनी भुमिका मांडली. आजही पुर्ण दिव्यागाना सरकार पगार देत नसल्यांचा आरोप करत शेतकरी, शेतमजुर व दिव्यागासाठी लढतांना आपल्यावर आज पर्यंत ३५० गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणे ३० जुन पर्यंत कर्ज माफी झाली नाही तर १ जुलैला राज्यात एकही रेल्वे चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

या मेळाव्यात ॲड वामणराव चटप, अनिल हेपट, राजन क्षीरसागर, सतीश पाटील देरकर, दिपक चटप, देवराव धांडे, अरूण नवले, दशरथ पाटील बोबडे, राजु भोंगळे , मोबिन शेख, विजय निवल आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते सतीश दरेकर, अनिल धांडे, देवराव धांडे, दशरथ पाटील बोबडे, अनिल गोवारदीपे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप गोहकार यांनी केले. तर आभार प्रदर्शन मोबिन शेख यांनी केले.