महाराष्ट्र ग्रामीण न्युजचे संपादक विनोद कनाके यांचा आज वाढदिवस

0
62

महाराष्ट्र ग्रामीण न्यूजचे संपादक विनोद कनाके यांचा आज वाढदिवस
तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्रामीण न्यूजचे संपादक मा. श्री. विनोद कनाके यांचा आज वाढदिवस आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे मुद्दे निर्भीडपणे मांडणारे पत्रकार म्हणून विनोद कनाके यांची ओळख आहे.
ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा देत सत्य, सामाजिक बांधिलकी आणि लोकहित जपणारे लेखन ही त्यांच्या कार्याची प्रमुख ओळख ठरली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ग्रामीण न्यूज हे माध्यम ग्रामीण आवाजाचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे.
आजच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व वाचकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पत्रकारितेतील सामाजिक कार्य अधिक व्यापक व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.