तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत माथार्जुन आश्रम शाळेला प्रथम क्रमांक
प्रतिनिधी: योगेश मडावी
झरी-जामनी तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनीत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, माथार्जुन येथील विद्यार्थ्यांनी “शाश्वत शेती” या विषयावर आकर्षक प्रयोग सादर करून प्रथम पारितोषिक पटकावले. त्यामुळे त्यांची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे.
2 ते 3 डिसेंबर 2025 रोजी मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल, बिरसाईपेठ येथे हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष म्हणून मा. प्रकाशभाऊ मॅकलवार व उद्घाटक म्हणून मा. कटोलकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. किशोर पागोरे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मुख्याध्यापक अविनाश मोरे व विज्ञान शिक्षक सचिन पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थी कृतिक केरवतकर (7 वी) व कार्तिक सोयाम (9 वी) यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रथम पारितोषिक तहसीलदार अक्षय रासने यांच्या हस्ते प्रदान झाले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून शुभेच्छा मिळाल्या.




