पिल्की वाढोणा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

0
35

पिल्की वाढोना येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी…
आदिवासी समुदायाची उपस्थिततीत भव्य रॅली आयोजित…
तालुका प्रतिनिधी
वणी : येथील आदिवासी बांधवांच्या वतीने मोठ्या थाटात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली असून या वेळेस पिल्की वाढोना येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर यावेळेस कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
बिरसा मुंडा हे एक प्रमुख आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला होता. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी हक्कांसाठी आणि त्यांच्या पारंपरिक संस्कृतीच्या संरक्षणासाठी ‘उलगुलन’ (महान उठाव) नावाची चळवळ सुरू केली. त्यांना “धरती आबा” (पृथ्वीचा पिता) म्हणून ओळखले जाते. सदर आदिवासींचे श्रद्धास्थान मानले जाणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली असून सदर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोनेकर साहेब, संदीप ढेंगळे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), प्रमुख पाहुणे प्रमोद क्षिरसागर, शंकर चार्लीकर, मनोज पावडे, प्रशांत जुमनाके (ग्रा.पं. सदस्य), गजानन नैताम, दशरथ जुमनाके, अमोल डोनेकर, गणपत आत्राम, अंकुश आत्राम, महेश जुमनाके, बेबीताई अरके, पूजा डोनेकार, गीता पेंदोर, प्रभावती जुमणाके, अनिता नैताम, वैशाली कुमरे, सुमन आत्राम,तथा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.