वणी शहरातील बाल चित्रकार प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित

0
92

वणी शहरातील बाल चित्रकार प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित
तालुका प्रतिनिधी
वणी – स्व. हरिभाऊजी नागतुरे ग्रामविकास व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था वणी व आर्टिस्ट स्पेस नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय
राज्यस्तरीय चित्रकला व शिल्प स्पर्धा व प्रदर्शन वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे दिनांक
२८/२९/३०/२०२५ रोजी घेण्यात आले होते
त्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री आमदार संजयभाऊ देरकर ह्यांच्या हस्ते पार पडले अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष मा.विजुभाऊ मुकेवार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे , मा.माझी आमदार संजीव भाऊ बोदकुरवार हे होते
तीन दिवसीय चित्रकला व शिल्प स्पर्धा प्रदर्शनात राज्यातील अनेक जिल्यातील चित्रकारांनी आप आपल्या चित्राचे व शिल्पाचे प्रदर्शन करण्यासाठी उत्कृष्ठ चित्रांचे प्रदर्शन करून सहभाग घेतला होता.
त्यात वणी शहरातील एस पी एम स्कूल वणी येथील ९ व्या वर्गातील विद्यार्थी अविष्कार संतोष चांदेकर याला सुद्धा आपल्या चित्राचे प्रदर्शन करण्या करीत स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्या राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनी स्पर्धेत प्रोत्साहनपर बक्षिसाचा मान मिळवून तो प्रोत्साहनपर बक्षिसाचा मानकरी ठरला
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम
सौ.किरणताई संजय देरकर
अध्यक्ष एकवीरा महिला बँक मारेगाव
मा.श्री अशोक सोनटक्के
मा श्री महादेवराव खाडे
मा श्री गजानन कासावार
ह्यांच्या हस्ते पार पडला
अविष्कार चांदेकर ह्यांनी आपल्या विजयाचे श्रेय
आपल्या शिक्षकांना व आई वडील यांना दिले