*विचारविनिमय सभा यशस्वीरीत्या संपन्न…

0
277

*विचारविनिमय सभा यशस्वीरीत्या संपन्न*
तालुका प्रतिनिधी
आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, रविवार रोजी आंबेडकर भवन, मुकूटबन येथे आयोजित ऑल इंडिया पँथर सेना यांच्या विचारविनिमय सभेचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या सभेचे उद्दिष्ट होते संविधान संरक्षण व संवर्धन, पँथर विचारांचा प्रसार, आणि समाजात नवचेतना जागवणे.
*सभेचे प्रमुख पाहुणे : *सामाजिक व सर्वसामान्य कार्यकर्ता योगेश भाऊ मडावी होते.*
*त्यांनी “पँथर चळवळीचे सामाजिक आणि ऐतिहासिक महत्व” या विषयावर मार्गदर्शन केले.*
*त्याचबरोबर अविनाश भाऊ मेश्राम आणि दिनेश भाऊ नैताम यांनीही उपस्थित राहून सहभाग दर्शविला.*
*या सभेला ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खाडे आणि*
*जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सोनोणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,*
ज्यामुळे सभेचे उद्दिष्ट अधिक प्रभावी व सुसंगत रित्या साध्य झाले.
या प्रसंगी संघटनेच्या संघटनात्मक कार्यामध्ये नवा अध्याय सुरू करत खालील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या
*ऑल इंडिया पँथर सेना, झरी तालुका*
*तालुकाध्यक्ष : पँथर प्रशांतभाऊ निमसरकर*
*तालुका उपाध्यक्ष : पँथर अनिल भाऊ मद्देलवार*
*तालुका संपर्क प्रमुख : पँथर प्रशांतभाऊ लोहकरे*
या जबाबदाऱ्यांची निवड करताना संघटनेच्या दृढ बांधिलकी, कार्यकर्त्यांचा लढाऊ आत्मा आणि पँथर विचारांप्रती निष्ठा लक्षात घेण्यात आली.
सभेला अनेक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
सर्वांनी एकत्र येऊन क्रांतीची ज्योत पेटती ठेवण्याचा आणि पँथर विचार जनमानसात रुजवण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही विचारविनिमय सभा संविधानवादी आणि पँथर विचारांना नवसंजीवनी देणारी ठरली.