
स्वंयशिक्षक यांना स्वयमप्रेरणेतुन भेट…..
गावातील प्रथम नागरिक यांनी दिले आपले मानधन……
ज्यांचे मन मोठे त्यांचे…
झरी जामणी – झरी तालुक्यातील सिंधीवाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वंयशिक्षक म्हणून काम करीत असलेले श्री, दिनेश गौरकार सर यांना शासणा मार्फत कोणतेही मानधन मिळत नाहीत, शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ज्ञानार्जनाचे काम देऊन ते आपली सेवा देत आहे, पण आपल्या गावातील विद्यार्थीना सेवा देत असणाऱ्या शिक्षकांचे भविष्य त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसा लागतोच ही जान ठेवून याच गावातील प्रथम नागरिक असलेले सरपंच श्री, विनोद निखाडे यांनी आपल्या सरपंच पदाचे मानधन १०,००० रूपये
हे श्री,गौरकार सर यांना देऊन उदारदेतेचे उत्तम उदाहरण सर्व समाजा समोर देवू केले जातं असून आजही समाजात दानपारमिता करणारे कमी नाहीत हे या घटनेने दाखवून दिले,



