वांजरी येथे कृषी संजीवनी प्रकल्प

0
82

आज दिनांक २८/०८/२०२५ रोज गुरुवारला मौजा-वांजरी येथे सचिन झिले यांचे शेतामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा -२ अंतर्गत कापूस पिकाची महिला शेतकर्यांची शेतीशाळा वांजरी गावच्या सरपंच अरुणाताई जेणेकार यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या शेतीशाळे करीता महिला शेतकर्यांनी उत्स्फुर्त प्रतीसाद दिला.तसेच पुरुष शेतकर्यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली. उपस्थित १०-१० शेतकर्यांचे गट तयार करून मागिल शेती शाळेमधील निरीक्षणाच्या तुलनेत व आताच्या निरीक्षणात झाडाच्या वाढीमध्ये तसेच किडी व रोग यात काय फरक दिसुन येतो हे सांगण्यासाठी शेतामधिल कापसाच्या झाडांची निरीक्षणे करून झाडांची उंची ,त्याचा घेर, झाडांवरील फांद्यांची संख्या, फुलांची संख्या,बोंडांची संख्या,मोजण्यात आली.तसेच झाडावर असलेल्या मित्र किडींची ओळख करुन देण्यात आली.पानांवरील रस शोषण करणाऱ्या किडी,बोंड अळ्या शोधुन त्यांच्या जिवन क्रमाबाबत तसेच त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानी बाबत माहिती देण्यात आली.व त्यांच्या नियंत्रणाच्या उपाय योजना मध्ये जसे- एकात्मिक किड नियंत्रण, रासायनिक किड नियंत्रण करण्याच्या उपाय योजना सांगण्यात आल्या.नैसर्गिक/जैविक नियंत्रण कसे फायद्याचे आहे, त्याकरिता दशपर्णी अर्क कसा तयार करावा, फवारणी करण्यासाठी त्यांचे प्रमाण किती घ्यावे,अर्काचा वापर कसा करावा,अर्का करीता वापरलेल्या दहा झाडांच्या पानांचा पिकाच्या वाढीसाठी व किडींवर होणारा परिणाम इत्यादी बाबत प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक करून माहिती देण्यात आली.तसेच फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत व औषधांच्य हाताळणी बाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.या शेती शाळेकरीता नैसर्गिक शेती अभियानाच्या कृषि सखी सौ.चेतनाताई काकडे व रत्नमालाताई सपाट यांनी दशपर्णी अर्काचे प्राथक्षिक करुन दाखविले तसेच ना.दे.कृ.सं.प्र.च्या कृषि ताई खुशबू तेलतुंबडे यांनी शेती शाळेकरीता मोलाचे योगदान दिले.तसेच सहाय्यक कृषी अधिकारी बि.व्ही.वनकर , सहाय्यक कृषी अधिकारी राहुल मेश्राम यांनी शेतकऱ्यांना
पिकावरील किड, रोग नियंत्रण बाबत, कृषि विभागाच्या विविध योजना जसे- रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, शेततळे, तुती लागवड,पि.एम.एफ.एम.ई.,पि.एम.किसान,एग्रिस्ट्याक,महाडिबीटी इत्यादी बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.