0
207

: मेंढोली ते पिपरी ( कायर) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधकामाचा प्रश्न तब्बल सहा वर्षांपासून प्रलंबित :

तालूका प्रतिनिधी:

वणी : मेंढोली ते पिपरी ( कायर) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधकामाचा प्रश्न तब्बल सहा वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व हलगर्जीपणाविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. जंगल परिसरातील अपुर्ण ६०० मीटर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज काळे यांनी ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांसह ३ एप्रिल, गुड फ्रायडे पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

मेंढोली ते पिपरी ( कायर) या सुमारे ४ किलोमीटर च्या
रस्त्याला २०१८ -१९ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली होती. खनिज विकास निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात
आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांच्या मार्फत ठेकेदार वैभव जिद्देवार यांना काम देण्यात आले होते. आणि प्रत्येक्ष कामाला सुरुवात झाली होती.माञ वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या ६०० मीटर रस्त्याच्या कामावर अडथळे उभे राहिले.
वनविभागाने २०२० मध्ये ञुटी दर्शवनारे पञ दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक पूर्तता केली नाही.
परिणामी मंजूर निधी परत गेला आणि जंगलातील रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाकडून ” काम पूर्ण झाले, निधी खर्च झाला” असा दावा केला जात असल्याचे संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.
फक्त माती कामासाठी ५० लाख रुपये खर्च होने शक्य नसल्याने या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. असे गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
अपुर्ण रस्ता परत गेलेला निधी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
वण परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक सहभागी झाले असून, ” रस्त्या पुर्ण झाला पाहिजे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासन याकडे लक्ष देणार का ? की या रस्त्या अजूनही अडकून राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.