गणपती आवारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🍬🍬
तालुका प्रतिनिधी :
झरी जामणी : सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर राहणारे माजी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष गणपती आवारी यांचा आज वाढदिवस आहे.
समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सत्यनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून गणपती आवारी यांची ओळख आहे.
विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात व मित्र परिवारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नातेवाईक व मान्यवरांकडून त्यांना मन: पुर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सर्व स्तरातून ” गणपती आवारी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाज कार्यात अधिक यश लाभो” अशा सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




