परसोडा येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
40

परसोडा येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी ”

तालुका प्रतिनिधी
वणी : दि १९ /२ /२०२६ रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वणी तालुक्यातील परसोडा (गोडगाव) येथे साजरी करण्यात आली. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात पदावली भजन गायनाने करण्यात आली. त्या नंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. चौकामध्ये देशभक्तीवर घोषणा देत वातावरण दुमदुमले होत.
यावेळी अमर बोबडे, पांडुरंग राजुरकर, मंगेश काकडे, विशाल तुरनकार, संभाशिव म्हसे, रोशन घुगूल, संतोष जांबुळकर, बालु ठाकरे, रुषी काकडे, आशिष बोबडे, कपील कुत्तरमारे, पुरूषोत्तम कुत्तरमारे, महेंद्र बोबडे, कैलास बोबडे, शनमुख ठाकरे, गणेश बोढे, सुधीर उपरे, प्रफुल जांबुळकर, अविनाश कातकळे, नागेश कातकडे , प्रविण बोबडे, प्रशांत बोबडे, राजु म्हसे, लोकेश तुरनकार, सुरज बोबडे, नामदेव बोबडे, महेश टेकाम, व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.