मुकूटबन पोलीसांची अवैध जुगार अड्ड्यावर व गोवंश तस्करावर धडक कार्यवाही

0
74

मुकूटबन पोलीसांची अवैध जुगार अड्ड्यावर व गोवंश तस्करावर धडक कार्यवाही

तालुका प्रतिनिधी :

झरी जामणी : आज दि १९/२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन मुकूटबनचे पो हेड कॉ दिपक ताठे यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरूण मा, पोलीस निरीक्षक सतीश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहितीची खात्री करून छापा कारवाई केली असता अब्दुल रज्जाक शेख मुखत्यार रा, मुकूटबन ता, झरी जामणी जि, यवतमाळ यांच्या कडून वरली मटका साहित्य व रोख रक्कम १४२०/ रुपये मिळून आल्याने ते त्याच्यापासून जप्त करून सदर आरोपी विरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
तसेच काल दि, १८/२/२०२६ रोजी गोवंश तस्करी करूण कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मॅक्झीमा कंपनीचे वाहन क्रमांक Ts -16 -UD-2832 हा पकडून तयामधुन ३ गोवंशची सुटका करून एकुण किमंत अंदाजे १,३८, ०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर माक्झीमा कंपनीचे चालकाविरुद्ध कलम ११(१) (घ), (ड.) (झ) प्रांण्याना कुरतेने वाघवणयास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम ,१९६० प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब या, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब , मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेश दडवे साहेब , मा पोलीस निरीक्षक सतीश जाधव साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे , पो, हेड कॉ दिपक ताठे , विनोद नागरगोजे, रवी ईसनकर, बादल जाधव,
निहाल राठोड यांनी केली आहे.