मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदारांना निवेदन
मागण्या मान्य न झाल्यास २३ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
झरी जामणी : प्रतिनिधी योगेश मडावी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित आमदारांना निवेदन सादर करण्यात आले. अनेक वर्षांपासून मनरेगा योजनेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही त्यांच्या सेवा-सुरक्षा व भवितव्याबाबत शासनस्तरावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मनरेगा अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर योजनांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित अथवा समायोजित करण्यात यावे. तसेच S-2 Infotech कंपनीमार्फत होत असलेली अनाधिकृत व अवैध भरती प्रक्रिया तात्काळ थांबवून संबंधित कंपनी रद्द करावी. सध्याच्या कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन (सोसायटी) मार्फत नियुक्ती देऊन “समान काम – समान वेतन” हे धोरण लागू करावे, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच मनरेगा विभागाचा स्वतंत्र आकृतिबंध (कॅडर स्ट्रक्चर) तयार करून पदनिहाय आकृतीबंध निश्चित करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शासनाकडून वारंवार निवेदने, आंदोलने व स्मरणपत्रे देऊनही कोणतीही सकारात्मक दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
या सर्व मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या २३ जानेवारी २०२६ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून केवळ न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी या विषयात लक्ष घालून संबंधित मंत्री व विभागाशी चर्चा करावी, विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा तसेच शासनस्तरावर मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. आपल्या सहकार्यामुळे हजारो मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आमदार संजय दरेकर यांना निवेदन सादर करतेवेळी योगिता काकडे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), अभिजीत जिड्डेवार (तांत्रिक सहाय्यक), रमेश राठोड (तांत्रिक सहाय्यक) व संतोष मेंढे, राजेश कर्नेवार (क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर)




