पानटपरी फोडून 20 हजारांचे साहित्य लंपास

0
95

पानटपरी फोडून 20 हजारांचे साहित्य लंपास

तालुका प्रतिनिधी

वणी : शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील अज्ञात चोरट्यांनी अमोल टी ॳॅड पान शेंटर फोडुन पंधरा ते वीस हजार रूपयेचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अमोल रमेश मडावी असे फिर्यादीचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांचे अमोल टी ॳॅड पान सेंटर आहे. अमोल हे शनिवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घराकडे गेले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञान चोरट्यांनी दुकान फोडुन आत प्रवेश केला. तसेच दुकानातील साहित्य लंपास केले. रविवारी पाहाटे घटना उघडकीस आल्यानंतर अमोल यांनी वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
दिवसेनदिवस वणी शहरात चोरींचे प्रमाण वाढले असुन या घटनेने वणी पोलीस स्टेशन समोर आवाहन उभे केले आहे .आता पोलीस त्या अज्ञान चोरट्यांचा शोध घेणार काय? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.