शीलाताई नागोराव गेडाम सायखेडा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज

0
387

शीलाताई नागोराव गेडाम सायखेडा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज

केळापूर प्रतिनिधी:
पांढरकवडा तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य शीलाताई नागोराव गेडाम या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सायखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.

गाव तसेच परिसरात सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करून दांडगा जनसंपर्क जपणाऱ्या शीलाताई गेडाम या जनतेच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

याआधी त्या सायखेडा पंचायत समिती गणा मधून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. सध्या त्या वाघोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी सर्कलमध्ये विविध विकासकामे राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

शीलाताई गेडाम या समाजकार्याबद्दल सदैव जागरूक राहिल्या असून, महिला बचत गट, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. अनेक ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्या गोंडी भाषिक असल्यामुळे सायखेडा जिल्हा परिषद गटातील आदिवासी आणि ग्रामीण मतदारांमध्ये त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत जनतेमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.

शीलाताई गेडाम यांच्या मते, “ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांवर अधिक भर देऊन विकासाचे नवे अध्याय उभारण्याचा माझा प्रयत्न असेल.”

सामाजिक कार्यातील सातत्य, प्रामाणिकपणा आणि जनतेचा पाठिंबा यामुळे शीलाताई गेडाम या सायखेडा जिल्हा परिषद गटातील बलाढ्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चुरस निर्माण करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.