दांडगा जनसंपर्क असलेले अमित बेबीबाई सुर्यभान ढोंबळे पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज

0
641

दांडगा जनसंपर्क असलेले अमित बेबिबाई सूर्यभान ढोबळे पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज

प्रतिनिधी – राळेगाव | ता

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वरद गटातून तसेच परिसरात सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेले अमित ढोबळे हे येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

त्या आधी त्यांनी सावरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली होती, परंतु त्यांचा अवघ्या कमी मताधिक्याने पराभव झाला. यावेळी पंचायत समिती गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अमित ढोबळे हे कोलाम समाजामध्ये लोकप्रिय असून नेहमीच समाजाच्या कार्यासाठी अग्रेसर असतात. आता ते सामाजिक कार्याच्या बळावर जनतेत उतरले आहेत. त्यांनी दिव्यांग, कष्टकरी शेतमजूर, महिला बचत गट, आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला आहे.

अनेक ग्रामीण महिलांना त्यांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविला आहे. त्यांच्या या कामामुळे परिसरातील महिला, शेतकरी, दिव्यांग तसेच युवकांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वरद पंचायत समिती गटातील मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकीत अमित ढोबळे हे एक बलाढ्य उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार,

“ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर काम करणे — विशेषतः पाणी, आरोग्य, रस्ते आणि शिक्षण या क्षेत्रांत बदल घडवून आणणे — हे माझे ध्येय आहे.”

अशा प्रकारे वरद गट परिसरातील जनतेचा पाठिंबा आणि त्यांच्या सामाजिक कार्याची छाप पाहता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.