*आदिवासी जमातीचा वणी उपविभागीय कार्यालयावर आरक्षण बचाव भव्य आक्रोश मोर्चा*
*आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव चे आयोजन*
तालुका प्रतिनिधी |
वणी : वारंवार आदिवासींचे आरक्षणात घुसखोरी होत असून जो तो आदिवासी मध्ये समाविष्ट करून आदिवासीत आरक्षण मिळण्याची मागणी करीत असतो. हल्ली मराठा समाजानी हैदराबाद गॅजेट चा संदर्भ देऊन आरक्षणाची मागणी केली. त्याच हैदराबाद गॅजेट ला अनुसरून महाराष्ट्रातील बंजारा व धनगर समाज हे अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी मध्ये आरक्षण मागत असून ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन करून महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बंजारा व धनगर समाज हा आदिवासी नसून तो आदिवासीचे कोणतेही निकश पूर्ण करीत नाही तसेच त्या त्या समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेले आहे. तरीही त्यांनी आदिवासींमध्ये समाविष्ट करून आरक्षणाची मागणी केली आहे जी भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारी असून संविधान बाह्य आहे.
आधीच आदिवासी समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या कमकुवत असून हे दोन समाज बलाढ्य आहेत. जर या दोन समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून आमचे आरक्षण दिले तर आदिवासींच्या वाट्याला जे आजवर आले तेही मूळ आदिवासी समाजाला मिळणार नाही त्यामुळे मूळ आदिवासी समाजाची परिस्थिती बिकट होईल.
त्यामुळे महाराष्ट्रातील आम्ही सखल आदिवासी समाज बंजारा व धनगर समाजाला आदिवासीत समाविष्ट करून आरक्षण देऊ नये अशी मागणी शासनाकडे मागणी करीत आहोत. त्यामुळे दिनांक 29/09/2025 रोज सोमवारला वणी शहरात आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव व सर्व आदिवासी समाज संघटनाचे नेतृत्वात भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्च्यात बहुसंख्येने आदिवासी समाजाने हजर राहून आपल्या अस्तित्वाचे संरक्षण करावे अशी विनंती वजा आवाहन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव यांनी केली आहे.




